ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार कार्यक्रम
सार्वजनिक न्याय विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या दलित वस्ती कार्यक्रमाच्या धर्तीवर शासनाने ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा एकात्मिक कार्यक्रम या योजनेला मंजुरी दिली असुन हि योजना सन २००४-०५ पासुन राबविण्यात यावी, असे ठरविले होते. या कार्यक्रमांतर्गत आदिवासी गावांना/ वस्त्यांना सामुहिक विकासाच्या सुविधा तसेब वैयक्तिक / कौटुंबिक तथा सामुहिक लाभाच्या योजना राबवायच्या आहेत.