जिल्हा परिषदेकडील समाज कल्याण विभागाच्या ५% दिव्यांग बांधवांकरीता योजना
१. मान्यताप्राप्त विशेष मुलांच्या अनुदानित विनाअनुदानित शाळेतील दिव्यांग मुलांना आवश्यक सोयी सुविधा पुरविणे सदर योजनेमध्ये समाज कल्याण विभागाअंतर्गत येणा-या दिव्यांग मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या दिव्यांगत्वाच्या गरजेनुसार साहित्याचा पुरवठा करणे.
२. विशेष मुलांच्या शाळांतर्गत जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा आयोजित करणे जिल्ह्यातील विशेष मुलांच्या शाळांतर्गत जिल्हास्तरीय
क्रिडास्पर्धा आयोजित करणे. जेणेकरून दिव्यांग मुलांना विविध खेळ खेळण्याकरीता प्रोत्साहन मिळेल व खिलाडूवृत्ती वाढेल. ३. दिव्यांग विद्यार्थ्यांकरीता विविध गुणदर्शन स्पर्धा आयोजित करणे सदर योजना शिक्षण विभाग (प्राथ) जि.प. पालघर यांचेमार्फत जि.प.शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांकरीता राबविली जाते.
४. दिव्यांग विद्यार्थ्यांकरीता कौशल्य कार्यशाळा आयोजित करणे सदर योजना ही शिक्षण विभाग (प्राथमिक), जि.प. पालघर यांचेमार्फत जि.प. शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांकरीता राबविली जाते.
५. दिव्यांग विद्यार्थ्यांकरीता तालुकास्तरावर थेरपीचे साहीत्य उपलब्ध करून देणे सदर योजना ही शिक्षण विभाग (प्राथ), जि.प. पालघर यांचेमार्फत जि.प. शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांकरीता राबविली जाते.
6. दिव्यांग पशुपालकांना म्हैस खरेदीसाठी अर्थसहाय्य सदर योजना पशुसंवर्धन विभाग यांचेमार्फत जिल्ह्यातील दिव्यांग शेतकरी व दिव्यांग पशु पालक यांचेकरीता राबविली जाते.
7. दिव्यांग महिलांना साहीत्य पुरविणे सदर योजना ही महिला व बालविकास विभाग यांचेमार्फत जिल्ह्यातील दिव्यांग महिलांना आवश्यक साहीत्याचा पुरवठा करून राबविली जाते.
8. दिव्यांग व्यक्तींना व्यावसायिक संगणक प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य सदर योजने अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना व्यावसायिक संगणक प्रशिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते.
9. दिव्यांग पालकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य सदर योजने अंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तीच्या मुलांना शिक्षण इ. १० वी पासून पुढील शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. जेणेकरून दिव्यांग व्यक्तीनी त्यांच्या पाल्याना शिक्षणापासून वंचित ठेवू नये.
10. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य सदर योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरीता विविध व्यवसायपुरक वस्तूंचा पुरवठा करणे.