विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही दिली इस्रो सेंटरला भेट

  • Start Date : 24/02/2024
  • End Date : 24/02/2024

२६ फेब्रुवारी २०२४

जिल्हा परिषद पालघर शिक्षण समिती व शिक्षण विभाग यांच्या संकल्पनेतून पालघरमधील विद्यार्थी व शिक्षकांनी इस्रो सेंटर बेंगलोर येथे भेट दिली.

जिल्हा परिषद पालघर शिक्षण समिती व शिक्षण विभाग यांच्या संकल्पनेतून पालघर जिल्ह्यातील इन्स्पायर मानक अवॉर्ड, स्पर्धा परीक्षा, राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद, विज्ञान प्रदर्शन आदी क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांची व शिक्षकांची निवड शिक्षण विभाग पालघर यांच्यामार्फत करून ३० विद्यार्थी, ८ शिक्षक, २ प्रशासकीय अधिकारी यांनी दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी इस्रो सेंटर बेंगलोर येथे भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण समिती सभापती तथा उपाध्यक्ष आणि सदस्य जिल्हा परिषद पालघर उपस्थित होते.

तज्ज्ञ वैज्ञानिकांनी दिली सविस्तर माहिती

भारताने आतापर्यंत प्रक्षेपित केलेले १३० पेक्षा जास्त कृत्रिम उपग्रह यांच्या प्रतिकृती यांची प्रत्यक्ष माहिती इस्रो सेंटरमधील तज्ड़ा वैज्ञानिकांनी विद्यार्थ्यांना दिली.

चंद्रयान-३ निर्मिती प्रक्रिया, चाचणी व प्रक्षेपण यांची प्रतिकृतीसह माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी यासंबंधी आपले प्रश्न, उपग्रह निर्मिती बाबतची कुतुहलात्मक शंका तज्ज्ञा वैज्ञानिकांना विचारली व त्या प्रश्नांची त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.

इसो बेंगलोर भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना विश्वेश्वरय्या विज्ञान केंद्र, लालबाग बोटॅनिकल गार्डन, इस्कॉन मंदिर, कर्नाटक विधान भवन, बेंगलोर पॅलेस, बोन्साय पार्क आदी शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांनादेखील आवर्जुन भेटी दिल्या.