१. सामाजिक आर्थिक व जात निहाय गणना २०११ नुसार ग्रामसभेने पात्र केलेल्या प्रपत्रब मधील लाभार्थीना निवारा उपलब्ध करुन देणे. २. उद्दिष्टांचे ६०% अनुजाती/ जमातीसाठी व ४०% इतर लाभार्थी तसेच १५% अल्पसंख्यांक लाभार्थी व ३% अपंग लाभार्थीना राखीव. ३. घरकुलामध्ये शौचालय असणे आवश्यक. ४. घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्याकडे स्वतःची जागा असणे आवश्यक. ५. ज्या लाभार्थीकडे स्वतःची जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थीना स्वतःची जागा संपादित करणे कामी प्रति लाभार्थीस प्रचलित जागेची किंमत किंवा रुपये ५०,०००/- यापेक्षा जी रक्कम रास्त राहील ती रक्कम पंडीत दिन दयाळ उपाध्याय योजना मधून लाभ देणे आहे. (सदर जागा खरेदी व्यवहारीची दस्त नोंदणी आवश्यक आहे १०,०००/-) मजुरीसाठी MGNREGA ची सांगड घालुन प्रतिदिन २०१ रु प्रमाणे ९० दिवसाची मजुरी नरेगा विभागामार्फत देण्यात येते.
योजनेचा तपशील :- १. सामाजिक आर्थिक व जात निहाय गणना २०११ नुसार ग्रामसभेने पात्र केलेल्या प्रपत्र ब मधील असावा. २. यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतलेला नसावा. ३. नैसर्गिक आपत्ती, अपंग, परित्यकत्या, घटस्फोटीत, माजी सैनिक व युध्दात वीरगती प्राप्त झालेल्याच्या कुटूंबांची प्राधान्यक्रमाने निवड. (SECC २०११ मधून निवड).
अनुदान व फायदे :- १. सदर योजनेतंर्गत केंद्र शासनाकडून ६०% अनुदान व राज्य शासनाकडून ४०% अनुदान प्राप्त होते केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घरकुलांची किंमत रक्कम रु.१,२०,०००/- व अति दुर्गम, डोंगराळ व नक्षलवादी भागाकरिता १,३०,०००/- निश्चित करण्यात आलेली आहे. रक्कम रु. १,२०,०००/- पैकी नवीन घरकुलाच्या बांधकामासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते. यामध्ये केंद्र शासनाचा अनुदान हिस्सा ६०% यामध्ये राज्य शासनाचा अनुदान हिस्सा ४०% घरकुलाची रक्कम १,२०,०००/- वरील अनुदान हे PFMS प्रणालीव्दारे लाभार्थीच्या बँक खातेवर जमा करता येते. २. घरकुलाचे बांधकाम कमीत कमी २५ चौरस फुट क्षेत्रफळ. वितरणाचा तपशील खालीलप्रमाणे (२०१७-१८ पासून). ३. घर मंजुर करताना पहिला हप्ता अग्रीम रु. १५,०००/-, दुसरा हप्ता रु. ४५,०००/-, तिसरा हप्ता रु. ४०,०००/-, चौथा हप्ता रू. २००००/-४. घरकुल बांधकाम पूर्ण वेळी शौचालयाचे देखील अांधकाम करावे लागते.