१. राज्यातील दारिद्र रेषेखालील अनुसूचित जमाती घटकांतील लोकांचे राहणीमान उंचावणे व त्याच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण भागामध्ये त्यांच्या स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधून देणे. २. अनुसूचित जमाती मधील जे अपंग लाभार्थी दारिद्र रेषेखाली नाहीत, ज्यांचे अपंगत्व ४०% पेक्षा अधिक आहे व वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत आहे अशा अपंग लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देणे. ३. घरकुलामध्ये शोचालय, निर्धार चुली बसविणे आवश्यक. ४.घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांकडे स्वतःची जागा असणे आवश्यक.
योजनेचा तपशील :- १. लाभार्थी अनुसूचित जमातीमधील दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील असावा. २.जे अपंग लाभार्थी दारिद्र रेषेखाली नाहीत, त्यांचे अपंगत्व ४०% पेक्षा अधिक असावे व वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत असावे. ३. लाभार्थी निवड दारिद्र कुटूंब गणना सव्र्व्हेक्षणाच्या आधारे तयार केलेल्या कायम स्वरुपी प्रतिक्षा यादीतून करावी. ४. यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
अनुदान व फायदे :- १. सदर योजनेतंर्गत राज्य शासनाकडून १००% अनुदान प्राप्त होते रु.१,२०,०००/- नवीन घरकुलाच्या बांधकामासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते यामध्ये घरकुलाचे बांधकाम कमीत कमी २६९ चौरस फुट क्षेत्रफळ, वितरणाचा तपशील खालीलप्रमाणे- १. घर मंजुर करताना पहिला हप्ता अग्रीम रु. १५,०००/-, दुसरा हप्ता रु. ४५,०००/-, तिसरा हप्ता रु. ४०,०००/-, चौथा हप्ता रू. २००००/- २. घरकुल बांधकाम पूर्ण वेळी शौचालयाचे देखील बांधकाम करावे लागते.