ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय क्र. पंविआ-२०२०/प्र.क्र.५९/वित्त-४ दि. २६ जून २०२० च्या मार्गदर्शक सूचना नुसार १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या निधीतून पंचायत राज संस्थांनी करावयाच्या बाबी, मुलभूत बेसिक अनुदान हा अबंधित (अनटाईड) स्वरूपाचा आहे. सदर अनुदानाचा ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी कर्मचारी पगार तथा अस्थापना विषयक बाबी वगळून इतर स्थानिक गरजानुसार आवश्यक बाबीवर वापर करतात, बंधित/ टाईड अनुदान बंधित अनुदानाचा वापर १) स्वच्छता व हागणदारीमुक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची देखबाल व दुरुस्ती २) पेयजल पाणीपुरवठा जल पुनरभरण / पावसाच्या पाण्याची साठवण जल पुनरप्रकीया बाबीसाठी खर्च करण्यात येतो.