परिचय
पंचायत समिती वाडा गटाची स्थापना 1962 रोजी झाली असुन तालुक्याचे एकुण क्षेत्रफळ 76.342 हेक्टर आहे. एकुण महसुली गावे 168 आहेत. ग्रामपंचायती संख्या 84 असुन सन 2011 च्या जनगणनेनुसार एकुण लोकसंख्या 1,60,924 आहे. वाडा तालुक्यामध्ये तिळसा येथे प्रसिद्ध असलेले शंकराचे मंदिर आहे. तेथे दरवर्षी महाशिवरात्री या दिवशी मोठी यात्रा भरते. हजारो भाविक तेथे दर्शनासाठी येतात. तेथे जवळच विठठल रखुमाईचे प्रसिद्ध मंदिर आहे. तसेच वाडा तालुक्यातील कोहोज किल्ला प्रसिद्ध आहे. त्या किल्यावर मंदिरे व कुंडे आहेत. दरवर्षी मकरसंक्रांतीच्या दिवशी किल्यावर यात्रा भरते. तसेच गालतरे येथे हरे राम हरे कृष्ण अंतर्गत श्रीकृष्ण लीला साकारली गेली आहे. श्रीकृष्णाचे अवतार, मथुरा नगरी, गोवर्धन पर्वत तयार केलेला आहे.पर्यटकांची ते पाहण्यासाठी खुप गर्दी असते. तसेच वाडा तालुक्यातील वाडा कोलम हा तांदुळ प्रसिदध आहे. बाजारपेठेत हया तांदळाला खुप मागणी आहे. वाडा तालुक्यामध्ये विविध बचतगट कार्यरत असुन त्या बचत गटामार्फत अनेक उपयोगी वस्तु , खादयपदार्थ बनविले जातात.