मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा अभियान

वाड्यात जि.प. शाळा हमरापूर प्रथम
‘माझी शाळा, सुंदर शाळा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा हमरापूरने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.
वाडा : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविलेल्या ‘माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा हमरापूर शाळेने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. याबद्दल शालेय समितीचे कौतुक केले गेले. या अभियानासाठी तालुकास्तरावर मूल्यांकनासाठी गटविकास अधिकारी, यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती. यात गटशिक्षणाधिकारी भगवान मोकाशी, विस्तार अधिकारी आदींचा समावेश होता.