महाआवास घरकुल योजना
महा आवास अभियान 2024-25
रोटरी क्लब अंर्तगत बांधलेल्या घरकुलांना वाडा तालुक्यातील आशियाना प्रकल्पासाठी मा.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते स्वयंसेवी संस्था (रोटरी क्लब, इ.) सक्रिय सहभागसाठी संपूर्ण महाराष्ट्रातुन पालघर जिल्ह्याला विशेष पुरस्कार देण्यात आला.
कालावधी : ०१ जानेवारी २०२५ ते १० एप्रिल २०२५
“ महा आवास अभियान 2024-25” राबविण्याचे उद्देश – ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे.
ग्रामीण गृहनिर्माण योजनांमध्ये शासकीय यंत्रणा व पंचायतराज संस्था यांचेबरोबरच समाजातील सर्व घटक जसे- स्वयंसेवी संस्था (लायन्स क्लब, रोटरी क्लब, इ.), सहकारी संस्था (साखर कारखाने, दुधसंघ, इ.), खासगी संस्था (Corporates), तंत्र शिक्षण संस्था (IITB, COEP, VNIT, इ.), बँका, लोकप्रतिनिधी, लाभार्थी, ग्रामस्थ, इ. भागधारकांचा सक्रीय सहभाग वाढविणे.
राज्यात ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रातील भागधारकांची क्षमताबांधणी व जन-जागृतीद्वारे लोक चळवळ उभी करणे.
लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा कृतिसंगम (Convergence) घडवून आणणे.
ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून घरांचा दर्जा व गुणवत्ता वाढविणे.