जल व जीवन मिशन

केंद्र शासनाने दिनांक २५.१२.२०१९ रोजी प्रसिध्द केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार केंद्र शासन देशातील ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन २०२४ पर्यंत “हर घर नल से जल” (FHTC-Functionl Household Tap Connection) प्रमाणे पाणी पुरवठा करण्यास कटिबध्द आहे. सन २०२४ पर्यंत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्ये घरात वैयक्तिक नळ जोडणीव्दारे दरडोई किमान ५५ लिटर प्रती दिन, गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दीष्ट आहे. जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राज्यातील जिल्हयातील सर्व वाडया वस्त्यातील प्रत्येक कुटुंबाला टप्प्या-टप्प्याने वैयक्तिक नळाव्दारे पाणी पुरवठा करणे अपेक्षित आहे. याबाबत जल जीवन मिशन मार्गदर्शक सुचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जिल्हयांनी जे वार्षिक कृती आराखडे तयार केले आहेत, त्यात अशा वैयक्तिक नळ जोडणी साठी सुधारणात्मक पुनःजोडणी (रेट्रोफिटिंग) च्या कामाचा समावेश केला आहे. अशा गावांसाठी, ज्या योजना सुधारणात्मक पुनःजोडणी साठी (रेट्रोफिटिंग) प्रथम टप्यात घ्यावयाच्या आहेत, त्यांचे अंदाजपत्रक तयार करणे बाबत खालीलप्रमाणे सुचना देण्यात येत आहे.