योजनेचे स्वरुप माहिती- महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग व जलसंधारण विभागाकडील शा.नि.ददभू/२०१०/प्र.क्र.६२/पंरा-
६. दि.१६/०९/२०१० व ३१.१०.२०१५ व २५/०१/२०१८. योजनेंतर्गत घ्यावयाची कामे:-
अ) ग्रामीण भागात दहन / दफन भूमीची व्यवस्था करणे, त्या सुस्थितीत ठेवणे व त्याचे नियमन करणे यासाठी स्मशान भूमीवर
हाती घ्यावयाची कामे: दहन/दफन भूसंपादन, चबुतऱ्याचे बांधकाम, शेडचे बांधकाम, पोहोच रस्ता, गरजेनुसार कुंपण वा भिती घालुन जागेची सुरक्षितता साधणे, दहन/दफन भूमीत विद्युतीकरण व आवश्यकतेनुसार विद्युतदाहीनी / सुधारित शवदाहीनी व्यवस्था, पाण्याची सोय, स्मशान घाट/नदीघाट बांधकाम (स्मशान व्यवस्थेसाठी आवश्यक तेवढे), जमीन सपाटीकरण व तळफरशी, स्मृती उद्यान,
आ) ग्रामपंचायत भवन/कार्यालय याबाबत हाती घ्यावयाची कामे: नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकाम व इमारती अंतर्गत सुविधा,
जुन्या ग्रामपंचायत इमारतीची पुनर्बाधणी / विस्तार, ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये वृक्षारोपण, परिसर सुधारणा, परिसराला कुंपन घालणे व इतर अनुषंगीक कामे.
इ) जन सुविधा योजनेतंर्गत कामांची व्याप्ती वाढविणेः ग्रामपंचायत हद्दीत आठवडी बाजार केंद्र विकसीत करणे, गावतलावातील गाळ काढून गावतलावांचे सुशोभिकरण करणे, घनकचरा व्यवस्था करणे, भूमीगत गटार बांधणे, ग्रामपंचायत हद्दीमध्ये अस्तित्वात असलेल्या विहिंवर सौरऊर्जेवर आधारित दुहेरी हातपंप बसविणे तसेच जलशुध्दीकरण आर ओ प्लांटची व्यवस्था करणे.
ई) जनसुविधा योजनेंतर्गत घेण्यात येणारे रस्तेः गावांतर्गत रस्ते, एका वस्ती/पाड्यांपासून दुसऱ्या वस्ती पाड्यापर्यंत जोडरस्ता बांधणे.
योजनेत सहभागाच्या अटी / शर्ती / पात्रता
१) या योजने अंतर्गत प्रत्येक कामास प्रशासकिय मान्यता ग्रामसभेच्या सहमती नंतर ग्रा.पं. मार्फत घेण्यात यावी. २) तांत्रिक मान्यता सक्षम अधिका-या मार्फत घेण्यात यावी. ३) अंदाजपत्रक व आराखडे नकाशे. ४) देखभाल दुरुस्ती/ग्रामपंचायत हमीपत्रक व ग्रामपंचायत ठराव. ५) सदर योजने अंतर्गत कामांची निवड जिल्हा नियोजन समिती मार्फत करण्यात येईल. ६) ज्या जागेवर बांधकाम करावयाचे आहे तेथील ७/१२ उतारा अथवा नमुना ८ जागेचा उतारा. ७) प्रस्तुत काम हे अन्य योजनेतुन प्रस्तावित किंवा मंजुर नसल्या बाबत दाखला प्रमाणपत्र. ८) प्रस्तावित जागेचा स्थळदर्शक नकाशा. ९) गट विकास अधिकारी यांचे शिफारशी सह प्रस्ताव ग्रा.पं. विभाग जिल्हा परिषद पालघर कडे सादर करण्यात यावा.