आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनिस, पर्यवेक्षिका व आशा सेविकांना पुरस्कार देणे
उत्कृष्ट अंगणवाडी कार्यकर्ता, मदतनीस व पर्यवेक्षिका व आशा सेविकांना पुरस्कार दिल्याने त्यांचे दैनंदिन कामात उत्साह वाढून अंगणवाडी केंद्रातील मुलांकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जाईल. मुलांच्या सर्वांगिण विकासाकडे लक्ष देवून कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. मुलांचे आरोग्य विषयक बाबींकडे व गुणात्मक दर्जा वाढविणेसाठी अधिक प्रयत्न करतील मुलांचे सर्वांगिण विकासाचे दृष्टीने व आपले केंद्रातील नोंदवह्या कामाबाबत कृतीशील राहतील व कामास प्रोत्साहन मिळेल.