जिल्हा परिषद उपकर योजना
प्रमुख अटी (१) अर्जदार महिला पशुपालक असावी. (२) अर्जदाराने स्वखर्चाने संकरीत गायीचा / म्हशीचा तीन वर्षांचा विमा उतरविणे बंधन कारक राहील. (३) अर्जदार अथवा त्याचा वैवाहिक जोडीदार शासकीय, निमशासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करीत नसावा वा निवृत्त झालेला नसावा. (४) अर्जदाराकडे जनावरासाठी निवारा, पाणी व खाद्य याची सोय असल्याचा ग्रामसेवक ग्रामपंचायत यांचा दाखला सादर करावा लागेल. (५) एका संकरीत गायी करिता / म्हशी करीता खरेदी किंमतीच्या ५० टक्के परंतु कमाल रू. २०,०००/- अनुदान लाभार्थीच्या बँक बचत खात्यात थेट जमा करण्यात येते.