जिल्हा परिषदेकडील समाज कल्याण विभागाच्या २०% अंतर्गत योजना
१. मागासवर्गीय वस्तीत जोडरस्ते बांधणे मागासवर्गीय लोकांच्या वस्तीमधील अंतर्गत मुख्यरस्त्याला जोडणारे जोडरस्ते बांधून देणे,
२. मागासवर्गीयांना नवीन घर बांधणीसाठी अगर दुरुस्तीसाठी अर्थसहाय्य मागासवर्गीय व्यक्तींना नवीन घरबांधणीसाठी किंवा त्यांच्या जुन्या घराच्या दुरूस्तीकरीता बांधकाम अभियंत्याकडील अंदाजपत्रकानुसार अर्थसहाय्य दिले जाते.
३.इ.५ वी ते ९ वी च्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकली पुरविणे सदर योजनेअंतर्गत इ. ५वी ते इ.९ वी च्या ज्या विद्यार्थ्यांना घरापासून शाळा दूर अंतरावर असल्याने पायी जावे लागते किंवा अन्य वाहतूक सुविधा उपलब्ध नसेल अशा विद्यार्थ्यांना सायकली पुरविल्या जातात.
४. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यवसायिक संगणक प्रशिक्षण देणे सदर योजने अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यवसायिक संगणक प्रशिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते.
स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणेकरीता लघुउद्योगासाठी घरघंटी चे वाटप करणे.
६. अनुदानित वसतिगृहातील मागासवर्गीय विदयार्थ्यांकरीता अभ्यासिका, स्पर्धा परिक्षा तयारी व सोयीसुविधा पुरविणे या योजनेअंतर्गत अनुदानित वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वसतिगृहातच विविध विषयांची पुस्तके, स्पर्धा परिक्षाबाबत उपयुक्त वाचन साहित्य व अभ्यासिकेकरीता आवश्यक असणा-या इतर सर्व सोयी सुविधा पुरविल्या जातात.
बाबींमुळे बंद पडू नये याकरीता आर्थिक सहाय्य केले जाते.
7.जि.प. मालकीच्या अनुदानित वसतीगृहांच्या इमारतींची देखभाल दुरुस्ती या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असलेल्या अनुदानित वसतीगृहांच्या इमारतीची आवश्यकतेनुसार दुरूस्ती केली जाते. जेणेकरून वसतीगृहामध्ये वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित इमारत मिळावी.
8. मागासवर्गीय लाभार्थ्यांना लघुउद्योगासाठी अर्थसहाय्य (शिलाई मशीन पुरविणे) सदर योजनेअंतर्गत मागासवर्गीय महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणेकरीता लघुउद्योगासाठी शिलाई मशिनचे वाटप करणे,
9. मागासवर्गीय शेतक-यांना शेतीची अवजारे पुरविणे- सदर योजनेअंतर्गत मागासवर्गीय शेतक-यांना आधुनिक शेतीकरीता शेतीस पुरक अशी अवजारे पुरविली जातात.