पंधरावे वित्त आयोग
केंद्र शासनाने पंधराव्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतीना देण्यात येणारा निधी ५० टक्के बंधीत स्वरुपात ठेवला असुन त्याचावापर मुख्यतः पिण्याच्या पाण्याच्या व स्वच्छतेच्या योजनांसाठी करण्यात यावा अशा सुचना दिलेल्या आहेत. १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत ग्रामपंचायतींना वितरीत होणारा निधी हा ग्रामविकास विभागातर्फे वितरीत करण्यात येतो. ग्राम विकास विभागाने १५ व्या वित्त आयोगाचा निधी वितरीत करण्याबाबतचा शासन निर्ण दि. ९ जुन २०२० निर्गमित केला आहे. निधीतील बंधीत निधी वितरीत करताना जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा योजना कार्यक्रमांसाठी वापरण्यात यावा. पंधराव्या वित्त आयोगांतर्गत ग्रांमपंचायतीना देण्यात येणाऱ्या निधी मधील, बंधीत स्वरुपातील निधी हा सद्यस्थितीत पाणी पुरवठयाच्या कामांसाठी प्राधान्याने वापरणे गरजेचे आहे. यास अनुसरुन पंधराव्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या निधी मधील, बंधीत स्वरुपातील निधी पुढील आदेश येईपर्यंत फक्त संबंधीत ग्रामपंचायतीने १०० टक्के कार्यात्मक घरगुती नळजोडणी (FHTC) देण्यासाठी वापरण्यात यावा, असे करताना खालील सुचनांचे पालन करण्यात येते. १. जी गावे जल जीवन मिशन अंतर्गत सुधारणात्मक पुनःजोडणी (रेट्रोफिटिंग) साठी कार्यकारी अभियंता यांच्या स्तरावर निवडण्यात आली आहे, त्यांची कार्यात्मक घरगुती नळ जोडणीची कामे (FHTC) ग्रामपंचायत पातळीवर पूर्ण करावी. ग्राम विकास विभागाने दिलेले वित्त आयोगाचा निधी वापरासंबधीचे प्रशासकीय अधिकार ग्रामपंचायतीस आहेत त्या मर्यादेत प्रशासकीय मान्यता ग्रामपंचायतीस देता येईल, अशा कामांना तांत्रिक मान्यता देण्यास उप अभियंता, पाणी पुरवठा व स्वच्छता उपविभाग, जिल्हा परिषद हे सक्षम राहतील. २. ज्या गावांमध्ये अधिक कामे (उदा. स्त्रोत विकास, नवीन स्त्रोतांचा शोध, उच्वं गुरुत्व वाहीन्या, पाण्याची टाकी बांधणे ई.) करुन कार्यात्मक घरगुती नळ जोडणीची कामे (FHTC) करावयाची आहेत. अशा गावांनी १५ व्या वित्त आयोगातून प्रथम १०० टक्के घरांना नळ जोडणीची कामे पूर्ण करावीत. राज्य मंत्री मंडळाच्या दि.०८/०७/२०२० रोजी झालेल्या बैठकीत राज्यात केंद्र शासन प्रणित जल जीवन मिशन राबविण्यात आली आहे. यानुसार राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला सन २०२४ पर्यंत वैयक्तिक नळ जोडणीव्दारे दरडोई किमान ५५ लिटर प्रती दिन, गुणवत्ता पूर्ण पाणी पुरवठा करण्याचे लक्ष्य आहे. सदर जल जीवन मिशन ५०:५० टक्के केंद्र व राज्य हिश्याने राबविण्यात येईल.
कृती आराखडा – १. जल जीवन मिशन अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला पिण्याच्या पाण्याची सुरक्षा देण्यासाठी प्रत्येक घरात कार्यात्मक नळ जोडणी व्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता हि किमान भारतीय दर्जा – BIS:१०५०० अशी असावी असे अपेक्षित केले आहे. २. राज्यातील प्रत्येक घराला कार्यात्मक घरगुती नळ जोडणीव्दारे (FHTC-Functionl Household Tap Connection) पाणी पुरवठा करण्यासाठी बेस लाईन सर्वेक्षण करुन पुढील ४ वर्षाचे नियोजन करण्यात यावे. ३. जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबास सन २०२४ पर्यंत घरगुती नळ जोडणी व्दारे पाणी पुरवठा सुविधा उपलब्ध करुन दयावयाची आहे. यानुसारगाव कृती आराखडा (VAP), जिल्हा कृती आराखडा (DAP) तयार करावा. सदर कृतो आराखड्यामध्ये द्यावयाच्या नियोजित घरगुती नळ जोडण्याचे व त्याकरीता आवश्यक असणाऱ्या निधीचे त्रैमासिक च वार्षिक नियोजन याचा समावेश आहे. ४. जल जीवन मिशनची अंमलबजावणी जल जीवन मिशनमध्ये पुढील प्रकारच्या योजनांचा समावेश करण्यात येतो. ५. ज्या योजना राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम (NRDWP) अंतर्गत सुरु आहेत, अशा योजनांची सुधारणात्मक पुनःजोडणी (रेट्रोफिटिंग) किमान ५५ LPCD प्रमाणे करुन कार्यात्मक घरगुती जोडणी करणे, तसेच त्या गावांमध्ये स्टैंड पोस्ट नळ पाणी पुरवठा योजना आहेत, अशा गावांमध्ये स्टैंड पोस्ट पासुन प्रत्येक कुटुंबापर्यंत घरापर्यंत घरगुती कार्यात्मक घरगुती नळ जोडणी देण्यासाठी पुर्वीच्या योजनांची सुधारणात्मक पुनः जोडणी (रेट्रोफिटिंग) करणे. ६. पूर्ण झालेल्या योजनांच्या बाबतीत ४० LPCD ऐवजी किमान ५५ LPCD पाणी पुरवठा करण्याच्या अनुषंगाने अशा योजनांची सुधारणात्मक पुनः जोडणी (रेट्रोफिटिंग) करणे. ७. ज्या गावांमध्ये पिण्यायोग्य मुबलक भुजल (किंवा अन्य पर्यायाव्दारे) उपलब्ध आहे, अशा गावामध्ये स्वतंत्र ९ योजना घेणे. ८. ज्या गावांमध्ये मुबलक भुजल (किंवा अन्य पर्यायाव्दारे उपलब्ध आहे, मात्र पाण्याची गुणवत्ता योग्य नाही, अशा गावांमध्ये जल शुध्दीकरण प्रकल्पासह स्वतंत्र योजना घेणे. ९. ज्या गावांमध्ये पाण्याचे प्रमाणे कमी आहे, अशा गावांसाठी प्रादेशिक / अने गाव योजना (Water Grid) घेणे, १०. आदिवासी भागात नळ पाणी पुरवठा सोय नसलेल्या आदिवासी गावे /वाडया/पाडे यांना कायमस्वरुपी पाणी पुरवठा करुन प्रत्येक घरात कार्यात्मक नळ जोडणीव्दारे पाणीपुरवठा करणे. शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे, अंगणवाडी इ. करिता सदर योजनेतुन नळ जोडणी देणे. तसेच एकाकी/ आदिवासी वाडी/ पाडयांकरीता सौरउर्जा आधारित नळ पाणी पुरवठा योजना राबविणे. ११. दलित वस्तीमधील सर्व घरांना कार्यात्मक नळ जोडणीव्दारे पाणीपुरवठा देणे व योजनांच्या लाभार्थ्यांची स्वतंत्र माहिती ठेवणे.