शरद पवार ग्राम समृध्दी योजना
कुक्कुट पालन शेड कामांचे नावः कुक्कुट पालन शेड बांधणे, लाभार्थ्यांला स्वयं रोजगारातून चांगले उत्पादन मिळावे तसेच त्याला आर्थिक बाबीचा ताण पडू नये म्हणून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (MREGS) अंतर्गत कुक्कुट शेड बांधून दिले जाते. १) १०० पक्षांसाठी कुक्कुट पालन शेड दिले जाते.अंदाजे र.रु.४९,०००/- २) मनुष्य दिन निर्मिती:- ६१. शेळी पालन शेड- कामांचे नाव: शेळी शेड बांधणे, लाभार्थ्यांला स्वयं रोजगारातून चांगले उत्पादन मिळावे तसेच त्याला आर्थिक ताण पडू नये म्हणून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (MREGS) अंतर्गत शेळी शेड बांधून दिले जाते. १) 10 शेळयांसाठी एक शेळी शेड दिले जाते. २) रक्कम रु.४९,०००/- ३) मनुष्य दिन निर्मिती :- ६१गोठा तयार करणे कामांचे नाव जनावराचा गोठा बांधणे, लाभार्थ्यांला स्वयं रोजगारातून चांगले उत्पादन मिळावे तसेच त्याला आर्थिक ताण पडू नये म्हणून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (MREGS) अंतर्गत गोठाशेड बांधून दिले जाते. १) सहा जनावरासाठी १ गायगोठा दिला जातो. २) रक्कम रु.७७,०००/-.३) मनुष्य दिन निर्मिती:- १०२.