शालेय पोषण आहार

योजनेचे लाभार्थी निकषः शोलय पोषण आहार योजनेंतर्गत १ली ते ८वी च्या विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीत शालेय पोषण आहार दिला जातो. सदर योजना केंद्रव राज्य शासनाच्या शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा, शासन मान्य अनुदानित शाळांना तसेच शासकीय व शासकीय अनुदानीत आश्रम शाळेतील अनिवासी विद्यार्थ्यांकरीता बनविण्यात येते. योजनेची उद्दीष्टे :- प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे, शाळांमधील पट नोंदणी, उपस्थिती वाढविणे, विद्यार्थ्यांची दुपार नंतर होणारी गळती रोखणे, विद्यार्थ्यांचे अध्यायनाकडे लक्ष केंद्रीत करणे, धर्म, जात, लिंग भेदभाव नष्ट करणे, योजनेचे स्वरूपः- पालघर जिल्हयामध्ये आठ तालुक्यात जिल्हा परीषद व खाजगी अनुदानित २३७५ शाळांमधील २३४७३९ इतके विदयार्थी शालेय पोषण आहारचा लाभ घेतात. त्यापैकी वाडा, पालघर, विक्रमगड तालुक्यातील एकूण ९५३ शाळामधील ६७५७८ विदयार्थ्यांना इस्कॉन फुड रिलीफ फाउडेशन या स्वयंसेवी संस्थे कडून अनुक्रमे वाडा व पालघर यामध्यवर्ती स्वयंपाक गृहातुन तयार शालेय पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येते आहे. पालघर येथे नोव्हेंबर २००६, वाडा येथे जानेवारी २००१ व विक्रमगड येथे ८ शाळामध्ये डिसेंबर २०१२ पासून आजपर्यंत इस्कॉन फुड रिलीफ फाउंडेशन या संस्थेकडून अनुक्रमे वाडा व पालघर यामध्यवर्ती स्वयंपाक गृहातून आहार देण्यात येतो. उर्वरीत १४२२ शाळांमधून १६७१६१ विदद्यार्थ्यांना स्थानिक पातळी वरुन शाळे मधुन बचत गट, गरजू महिलांकडून शालेय पोषण आहार शिजवून देण्यात येतो.