शासकीय योजना
१. आंतरजातीय विवाहीतांना प्रोत्साहनपर अनुदान देणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे समाजातील जातीय भेदभाव दुर करून एकात्मिकतेची भावना रूजविणे. या करीताच केंद्र शासन व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरजातीय विवाह करणा-या जोडप्याला राज्य शासन- २५००० व केंद्र शासन- २५००० असे एकुण ५०००० प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते.
२. अनु.जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे राज्य शासनस्तरावरील सदर योजनेअंतर्गत अनु.जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये रस्ते, लाईट, पाणी इ. सोयी सुविधा पुरविणे तसेच सदर वस्तीमध्ये समाजमंदीर बांधून दिले जाते.