सुधारणात्मक पुनर्जोडणी(रेट्रोफिटिंग)

ज्या योजनांचा संकल्पन कालावधी किंवा योजनेचे आयुष्य संपलेले नाही व ज्या योजनांमधुन सद्यस्थितीत पाणी पुरवठा सामुदायिक, सार्वजनिक नळाव्दारे होत आहे, अशा योजनांमधुन दरडोई दररोज ५५ लिटर पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येते. अस्तित्वातील ज्या योजना दरडोई दररोज ५५ लिटर याप्रमाणे पाणी पुरवठा करण्यासाठी सक्षम आहेत किंवा, या योजनांमध्ये पंपिंग तास वाढवुन / पंपिंग मशिनरीमध्ये किरकोळ सुधारणा करुन दरडोई दररोज ५५ लिटर पाणी देणे शक्य आहे, अशा योजनांमध्ये वैयक्तिक नळ जोडणी देणे या कामाचा समावेश सुधारणात्मक पुनःजोडणी (रेट्रोफिटिंग) या शिर्षाकाखाली करण्यात यावा आणि वैयक्तिक नळ जोडणी देण्याचे काम तात्काळ सुरु करण्यात यावे.

वरील गावांमध्ये गावातील अंतर्गत वाढीव वितरण वाहिन्या, आवश्यक असल्यास त्या कामाचा समावेश देखील याच सुधारणात्मक पुनःजोडणी (रेट्रोफिटिंग) मध्ये करण्यात यावा.