डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना

Objective of the scheme-

जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून जीवनमान उंचावणे व त्यांना स्वयंपूर्ण करणे.

Allowable Benefit-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेतर्गत लाभार्थ्यास नवीन विहीर रक्कम रु. ४,००,०००/- जूनी विहीर दुरुस्ती रक्कम रु. १,००,०००/- किंवा शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या प्रचलित आर्थिक मापदंड व शेततळ्याचे आकारमानानुसार परिगणीत होणा-या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या ९०% किवा रक्कम रु. २,००,०००/- यापैकी एकाच घटकाचा लाभ अनुज्ञेय राहील. प्रत्येक घटकासोबत पंपसंचासाठी वीज जोडणी आकार रक्कम रु. २०,०००/-

ठिबक सिंचन संचप्रति थेंब अधिक पीक योजनेअंतर्गत

(१) अल्प / अत्यल्प भूधारकांसाठी ५५% मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून २५% + बिरसा मुंडाक्षिक्रांती योजनेतुन १०% तसेच

(२) बहु भुधारकांसाठी ४५% मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजतून ३०% बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेतुन १५% किया रु. ९७०००/- यापैकी में कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील.

तुषार सिंचनप्रति चेंब अधिक पीक योजनेअंतर्गत

(१) अल्प / अत्यल्प भूधारकांसाठी ५५% मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून २५% + बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेतून १०% तसेच

(२) बहु मुधारकांसाठी ४५% मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजतून ३०% बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेतून १५% किंवा रु. ४७,०००/- यांपैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील, पंपसंच (डिसेल / विदयुत) १० अश्वशक्ती क्षमतेपर्यंत पंपसचाकरीता प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या ९०% किंवा रु. ४०,०००/-यांपैकी जे कमी असेल ते अनुदान अनुदय राहील. पीव्हीसी पाईप ५०,०००/- परसबाग- ५००००/- असे पॅकेज देण्यात येईल.

लाभार्थी निवड निकष –

१. लाभार्थी हा अनुसूचित जाती / नवबौध्द शेतकरी असला पाहिजे.

२. शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असले पाहिजे.

३. शेतकन्यांचे नावे जमिन धारणेचा ७/१२ दाखला व ८-अ चा उतारा असणे आवश्यक आहे.

4. Beneficiaries must have an Aadhaar card. Beneficiaries must have a bank account and the bank account must be linked to the Aadhaar card.

५. दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांस प्रथम प्राधान्य राहिल.

६. सदर योजनेच्या लाभार्थ्यासाठी लागु असलेली रक्कम रु. १,५०,०००/ वार्षिक उत्पन्न मर्यादेची अट रद्द करण्यात येत आहे.

7. For new wells, the minimum area should be 0.40 hectares and for other items under the scheme, excluding new wells, the minimum area should be 0.20 hectares and the maximum area limit for all items under the scheme will be 6.00 hectares of agricultural land. However, since the land of the resident beneficiaries is in remote areas and fragmented, if two or more beneficiaries holding less than 0.40 hectares come together and their combined land area is at least 0.40 hectares, they will be eligible for the benefits of the scheme if they give a written agreement. Similarly, the condition of maximum holding area of ​​6.0 will not be applicable to beneficiaries below the poverty line.

८. सदर योजनेंतर्गत लाभार्थ्यास नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती किंवा शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण यापैकी एकाच घटकाचा लाभ देय राहील.

 To avail the scheme –

योजनेचा लाभ घेण्याचं दृष्टीने महा-डोबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेत स्थळ आहे. या संकेत स्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा, सादर योजनेबाबत अधिक माहिती जाणून घेणेसाठी आपल्या संबंधित पंचायत समितीतील कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.